
Kolhapur Shivaji University Tragedy : शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागामधील विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, राहणार सांगलीवाडी, सांगली) हिने आज वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने विद्यापीठ परिसर हादरून गेला तर तिच्या कुटुबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कुटुंबीयांना शवविच्छेदनास विरोध केला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.