esakal | फुटबॉलमध्ये शिवराज स्कुलला दूहेरी मुकूट

बोलून बातमी शोधा

Shivraj School Wins In Football Kolhapur Marathi News

गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेन्ट कन्सोन ग्लोबल (टीसीजी) फौंडशनतर्फे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कुलने दहा आणि बारा वर्षे वयोगटात दुहेरी विजेतेपद पटकावुन वर्चस्व राखले.

फुटबॉलमध्ये शिवराज स्कुलला दूहेरी मुकूट
sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेन्ट कन्सोन ग्लोबल (टीसीजी) फौंडशनतर्फे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कुलने दहा आणि बारा वर्षे वयोगटात दुहेरी विजेतेपद पटकावुन वर्चस्व राखले. साधना विद्यालय आणि गडहिंग्लज हायस्कुलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यू होरायझनचा साई बनगे आणि शिवराजचा अर्थव बंग्यानावर यांनी स्पर्धावीरचा बहुमान पटकाविला. गेल्या पंधरा दिवसापासून एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर सुरू असणाऱ्या टीसीजी युनायटेड बेबी लिग स्पर्धेत एकुण 12 शालेय संघानी सहभाग घेतला होता. यंदा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. 

बारा वर्षाखालील गटात एकुण 21 साखळी सामने झाले. यात शिवराज स्कुलने चार सामने जिंकले, तर एक बरोबरीत ठेवत 13 गुणासह अजिंक्‍यपद पटकाविले. गडहिंग्लज हायस्कुल आणि न्यू होरायझन स्कुल यांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले, तर एक बरोबरीत राखत समान दहा गुण मिळवले. अखेर गोल सरासरीवर गडहिंग्लज हायस्कुलने बाजी मारत उपविजेतेपद, तर साधना हायस्कुलला आठ गुणासह तिसऱ्या स्थानावर रहावे लागले. दहा वर्षाखालील गटात एकुण दहा सामने झाले. यातही शिवराज स्कुलने तीन सामने जिंकले व एक सामना बरोबरीत ठेवत सर्वाधिक दहा गुणासह विजेता ठरला. साधना विद्यालय सात गुणासह उपविजेता, तर सर्वोदया स्कुल 6 गुणासह तिसरा आला. 

साखळी सामने झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. भुपेंद्र कोळी यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. टीसीजी फौडेंशनचे इंजिनियर दयानंद चौगुले, प्रा. प्रमोद इंचनाळकर, संजय पाटील यांच्याहस्ते विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना क्रीडासाहित्य, चषक देण्यात आले. स्पर्धा समन्वयक ओंकार घुगरी, ओंकार सुतार यांचा सत्कार झाला. या वेळी युनायटेडचे संचालक सुनिल चौगुले, संभाजी शिवारे, प्रसाद गवळी, सुरज तेली, ओंकार जाधव, यासीन नदाफ, खेळाडू, क्रीडाशिक्षक आणि पालक उपस्थित होत. हुल्लाप्पा सुर्यवंशी यांनी आभार मानले. 

सर्वोत्कुष्ठ खेळाडू 
गोलरक्षक : आयन मुल्ला,आदित्य पाटील 
बचावपटू : अनमोल तरवाळ,तेजस सावरतकर 
मध्यरक्षक : अजिंक्‍य हातरोटे, ज्ञानेश्‍वर कावडे 
आघाडीपटू : दर्शन तरवाळ, विनायक गोंधळी

संपादन - सचिन चराटी

kolhapur