
MP Dhairyashil Mane : पक्ष नेतृत्वाचा नेते आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद तुटला की पक्ष फुटतो, असे स्पष्ट मत खासदार धैर्यशील माने यांनी आज येथे व्यक्त केले. शिवसेनेत त्यावेळीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव नेतृत्व होते जे राज्याला दिशा देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणारे होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो, असेही खासदार माने यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रमात खासदार माने यांनी शिवसेना का सोडली यावर भाष्य केले.