
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेकफेल झालेल्या बसची पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी झाले.
शिवशाहीचा ब्रेक फेल, तीन वाहनांना धडक; दोघे जखमी
घुणकी - पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bengaluru Highway) किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेकफेल झालेल्या बसची (Shivshahi Bus) पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी (Injured) झाले. ही घटना घडली.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी--पुण्याहून बेळगावकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसचा (एम-एच-०७-सी ७१४६) किणी पथकर नाक्याजवळ आली असताना ब्रेक निकामी झाला. त्यामुळे पथकर देण्यासाठी उभारलेल्या वँगँनार मोटरगाडी (एम-एच-०३-सीजी २८१५) ला धडक दिली. त्यातील दोघेजण जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.
शिवशाहीने वँगँनारला धडक दिल्यानंतर हुंडाई मोटारगाडी (एम-एच-४६- बीक्यू १९०९), कार (एम.एच.०४-डी.जे. ७९७८)यासह अन्य दोन गाड्या एकमेकांना धडकल्या. या सर्व कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
Web Title: Shivshahi Break Fail Accident Two Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..