

Gang war in Kolhapur Instagram rivalry
esakal
Social media dispute KOlhapur : तीन महिन्यांपूर्वी केलेल्या हल्ल्याच्या वादाचा बदला म्हणून रिक्षाचालक शोएब उर्फ साद मुबारक पठाण (वय २३, ओंकार कॉलनी, मणेर मळा, उचगाव) याचा धारधार शस्राने वार करून खून करण्यात आला. टेंबलाई टेकडीच्या पिछाडीस सोमवारी झालेल्या हल्ल्यात त्याच्या शरीरावर दहाहून अधिक वार केले होते. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य संशयित आदित्य सुखदेव ओहोळ (२४, रा. जोशीनगर, संभाजीनगर) यांच्यासह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.