

Danoli Yatra amusement ride incident Shirol Kolhapur
esakal
Danoli yatra ride malfunction : दानोळी येथील खंडोबा देवाची यात्रा व हजरत पीर गैबीसाहेब उरुसामध्ये शुक्रवारी रात्री आकाशपाळणा अचानक बंद पडल्याने मोठी धांदल उडाली. पाळण्याचे कप्लिंग खराब झाल्यामुळे सुमारे दीड तास पाळणा हवेतच अडकून राहिला. त्यामध्ये बसलेले शंभरहून अधिक यात्रेकरू, तसेच लहान मुले, महिला आणि वृद्ध यांची अक्षरशः घालमेल झाली.