
Kolhapur Krishna river : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या पुलावर येताच फोन आला म्हणून पतीने दुचाकी थांबवली... तेवढ्यात पत्नीने स्वतःजवळील मोबाईल पतीच्या हातात दिला अन् थेट नदीत उडी मारली. पतीने आरडाओरडा केला. परंतु, पाण्याला प्रवाह असल्याने ती वाहून गेली. पतीसमोर पत्नीने उडी घेतल्याने खळबळ उडाली.
संबंधित महिला कवठेमहांकाळ तालुक्यातील असल्याचे समजते आहे. सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. मात्र, ती महिला मिळून आली नाही. दरम्यान, जयसिंगपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.