
Brother Stabs Brother News : गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना येथे रविवारी रात्री पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात विठ्ठल कृष्णा पवार (वय ६५, रा. वळिवडे रस्ता, गांधीनगर) गंभीर जखमी झाले. ऋषिकेश सुनील पवार (२१) आणि अलका ज्ञानू पवार (६०) जखमी झाले.
याबाबत गांधीनगर पोलिसांनी गणेश ऊर्फ प्रथमेश आनंदा कांबळे (२६), अनिकेत शिवाजी कांबळे (२५), राजू रावसाहेब कांबळे (४५), बजरंग रावसाहेब कांबळे (४२), सचिन आनंदा कांबळे (४२, सर्व रा. राधास्वामी मंदिर, वळिवडे रस्ता, गांधीनगर) या सर्वांना अटक केली. याबाबत नीलेश ज्ञानू पवार (२९ , रा. राधास्वामी मंदिर, गांधीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.