

kolhapur Kalamba jail shocking attack incident
esakal
Prisoner Attacked In Toilet Queue : कोयता हल्ला प्रकरणातील संशयित गुन्हेगार अजय अनिल पाथरूट (वय २६, रा. सायबर चौक) याच्यावर कळंबा कारागृहात हल्ला करण्यात आला. सायबर चौकातील पूर्वीच्या वादातून कारागृहात हा प्रकार घडल्याचे समोर आले. याप्रकरणी आकाश ऊर्फ अक्षय आनंदा माळी (२३) व नीलेश उत्तम माळी (दोघे, रा. सायबर चौक परिसर) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कारागृहातील बरॅक क्रमांक पाच जवळ हा प्रकार घडला.