
Kolhapur Crime News : शहापूर पोलिस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचा निर्घृण खून झाला. लोखंडी हत्याराने डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाल पांडा (वय ३८, रा. मूळ ओडिशा, सध्या विनायक हायस्कूलसमोर, शहापूर) याचा जागेवरच मृत्यू झाला. तिघे हल्लेखोर ताब्यात घेतले असून दोन ते तीन परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले असून, शहापूर पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या प्रवेशद्वारात हा प्रकार घडला.