धक्कादायक ः कोल्हापूर शहरात उपचाराशिवाय अनेकजण कोरोनामुक्त, सर्वेक्षातून माहिती उघड

Shocking: In Kolhapur city, without treatment, many people recovered from Corona
Shocking: In Kolhapur city, without treatment, many people recovered from Corona

कसबा बीड, कोल्हापूर ः कोल्हापुरातील अनेक लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. क्रोम कंपनीच्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. कोरोना झालेले लोक उपचार न घेता बरे झाले आहेत. सर्वे दोन- तीन दिवसांत पुर्ण होईल. तेव्हा कोल्हापूरातील कोरोनाची स्थीती स्पष्ट होणार आहे. याचबरोबर कोरानाची साखळी तोडण्यासाठी दक्षतेची गरज आहे. 
कोरोनाची कोल्हापूर जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती तपासणीसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर शहरात अँन्टीबॉडी टेस्ट करण्यासाठी "क्रोम' कंपनीला सुचना दिल्या होत्या. या सर्वे मधून तीनच दिवसांत धक्कादायक सत्य समोर येत आहे. 
लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील जनतेने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या नियमांचे कडक पालन करून राज्यात आदर्श निर्माण केला होता. गेल्या महिन्यात शिथीलता दिल्यामुळे लोकांनी बेशिस्तीने कोरोना ला धोकादायक स्थितीत नेऊन ठेवले आहे. 
संभाजी नगर परिसरात दोन दिवसापुर्वी झालेल्या अँन्टीजेन टेस्ट मधून नव्वद लोकां पैकी सत्तावीस लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. म्हणजे या लोकांना पंधरा दिवसात कोरोना विषाणूची लागण होऊन गेली आहे. हे लोक आपोआप बरे झालेत. पण त्यांनी समाजातील अनेक लोकांना बाधित ही केले आहे. यासाठी अशा टेस्ट वाढवून कोरोना जास्तीतजास्त लोकांना शोधून त्यांच्यावर लवकर औषधोपचार करता येईल. 

हर्ड इम्युनिटी तयार होत आहे 
मुंबईमधील धारावी सारख्या झोपडीतील दाटीवाटीच्या परिसरात हर्ड इम्युनिटी तयार झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा आपोआप कमी आला. हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी साठ टक्के लोकांना कोरोनाची लागण होणे अपेक्षित आहे. कोल्हापूरात सध्या तीस टक्के पर्यंत हा आकडा आहे. अजून महिन्याभरात हर्ड इम्युनिटी तयार होऊन लोक आपोआप बरेही होतील. अशावेळी लोकांनी वयैक्तीक अंतर राखणे, सक्तीने मास्कचा वापर करणे, सण समारंभ टाळणे या गोष्टी सांभाळल्यातर कोरोना वर मात करणे सोपे होणार आहे. 

तीन महिने जोखमिचे 
येणाऱ्या तीन महिन्यात लोकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. आपल्या आसपास एखादी व्यक्ती कोरोना ने मयत झाली की एक दोन दिवस लोक भितीने घरात बसतात. पुन्हा कांही न घडल्या सारखे विना मास्क फिरत असतात. कोरोना लस येण्यासाठी अजून किमान तीन चार महिने लागू शकतात तोपर्यंत लोकांना घरी थांबणे गरजेचे आहे. 

-संपादन ः यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com