
गौरव डोंगरे
कोल्हापूर : शाळा, महाविद्यालयाच्या नावाखाली श्वान शर्यती, घोडागाडी शर्यतीकडे मुलांचा ओढा वाढल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शर्यतीतील ईर्षेपेक्षाही गावगाडा मालकांच्या समर्थकांचे शाब्दीक युद्धच अधिक चर्चेत आहे. यातच आता ‘भंडारा’, ‘रुमाल’, ‘लिंबू’, ‘तांदूळ’ यांची भर पडत आहे. सीमाभागीतील ‘देवा’चा गंडे-दोरे देण्याचा बाजार जोमात असून, बेरोजगारांची फौजच त्याच्या मागे फिरताना नजरेस पडते.