
Navid Mushrif
esakal
Kolhapur Politics Gokul Dudh :‘गोकुळला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला आहे. तो दर्जा पूर्वीपासून आहे. तो आजही आहे, ही बाब चांगली आहे. गोकुळ ही चांगली संस्था आहे. मात्र, ‘अ’ वर्ग दर्जा आम्हीच मिळवला, असा अविर्भाव नसावा. दरम्यान, सभेत सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो म्हणणाऱ्या अध्यक्षांनी उत्तरे न देताच सभा संपविली. त्यामुळे अध्यक्षांची पळपुटी भूमिका योग्य नसल्याची टीका संचालिका शौमिका महाडिक यांनी केली.