esakal | कोल्हापुरातील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतींना देशभरातून मागणी

बोलून बातमी शोधा

VIDEO: कोल्हापुरातील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतींना देशभरातून मागणी
VIDEO: कोल्हापुरातील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतींना देशभरातून मागणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने अयोध्येच्या नव्या विकास पर्वाला प्रारंभ झाला आहे. त्याचवेळी येथील महाव्दार रोड, वांगी बोळ परिसरातील प्रसिध्द कलाकार दीपक सुतार-महामुनी यांनी श्रीराम मंदिराच्या छोट्या प्रतिकृती साकारल्या असून त्याला देशभरातून ऑनलाईन मागणी वाढली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यापासून दहाहून अधिक प्रतिकृती येथे साकारल्या असून आठ व बारा इंची आकारात त्या उपलब्ध केल्या आहेत.

सुतार- महामुनी यांचा लाकडापासून खेळणी तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय. मात्र, प्लास्टिकच्या खेळण्यामुळे लाकडी खेळण्यांवर मर्यादा आल्या आणि त्यांनी नवे पर्याय शोधले. ऍक्रॅलिक बोर्डत पदार्पण केले. मात्र, त्यातही स्पर्धा अधिक असल्याने क्राफ्ट वर्कवर भर दिला. यात कलाकुसरीला वाव आहे.

दरम्यान, "एमडीएफ' म्हणजेच मिनिमम डेन्सिटी फायबर हे माध्यम बाजारात उपलब्ध झाले आणि त्यात मोठ्या संधी मिळाल्या. काम करायला सोपं, दिसायला चांगलं आणि टिकाऊ असे हे माध्यम असल्याने त्यातच विविध कलाकृती आकार घेवू लागल्या. त्याचबरोबच ट्रॉफी व्यवसायातही ते आले. हे सुरू असताना वेगळं काही तरी करण्याच्या उद्देशाने इंटरनेटवर विविध छायाचित्रे पाहात असताना श्रीराम मंदिराच्या छोट्या प्रतिकृती साकारण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि मंदिराची प्रतिकृती आकाराला आली. मात्र, त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडणार नाही म्हणून त्याच्या छोट्या प्रतिकृती तयार केल्या आणि त्या ऑनलाईन उपलब्ध होताच देशभरातून मागणी वाढू लागली.

ज्या पध्दतीने लोक ताजमहालची प्रतिकृती आठवण म्हणून घरी आणतात. त्याच पध्दतीने राम मंदिराची प्रतिकृतीही घरोघरी असावी, या उद्देशाने या प्रतिकृती उपलब्ध केल्या आहेत. अल्पावधीतच त्याला चांगली मागणी आहे.

- दीपक सुतार- महामुनी.

Edited By- Archana Banage