
नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : नवजात किंवा वर्षाच्या आतील बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जातात. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील बालमृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. २०१९ मध्ये कोल्हापूरचा बालमृत्यू दर हा ११ टक्के होता. तो २०२४ मध्ये ९ टक्क्यांवर आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत ध्येयानुसार २०३० पर्यंत बालमृत्यूचा दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याने हे उद्दिष्ट गेल्या वर्षीच पूर्ण केले आहे.