Smart Meter Complaints: ‘स्मार्ट मीटर’बाबत सर्वाधिक २६६ तक्रारी महावितरणच्या ग्राहक समाधान शिबिरात ४०४ तक्रारी दाखल
404 Complaints Filed at Customer Satisfaction Camps: महावितरणच्या कोल्हापूर मंडलातील ४७ ग्राहक समाधान शिबिरांमध्ये ४०४ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी तब्बल २६६ तक्रारी स्मार्ट मीटरशी संबंधित होत्या, तर ३९७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
कोल्हापूर: महावितरणतर्फे जिल्ह्यात उपविभागीयस्तरावर ४७ ठिकाणी ग्राहक समाधान शिबिरे घेण्यात आली. यामध्ये एकूण ४०४ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील सर्वाधिक २६६ तक्रारी या ‘स्मार्ट मीटर’ संदर्भातील होत्या.