

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विवाह सांगलीतील खेडेगावात पार पडणार असून सेलिब्रिटींची उपस्थिती दिसणार आहे.
esakal
Smriti Mandhana Wedding in Sangli : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार, निर्माता पलाश मुच्छल यांच्या विवाहाची सध्या जोरदार धूम सुरू आहे. हळदीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. रविवारी (ता. २३) या दोघांचा विवाह सोहळा सांगलीतील समडोळी फाटा येथील फार्म हाऊस येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचे आगमन झाले आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटीही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.