सुडाचं आणि खूनशी राजकारण केलं जातंय, संविधानाला धक्का दिला तर लढाईच; विश्‍वंभर चौधरींचा भाजपला स्पष्ट इशारा

आरक्षण मागच्या दाराने हटविण्याचा प्रयत्न सुरू असून, महाराष्ट्र तोडणे हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे.
Nirbhay Bano Abhiyan Kolhapur Social Worker Vishwambhar Chaudhary
Nirbhay Bano Abhiyan Kolhapur Social Worker Vishwambhar Chaudharyesakal
Summary

'महाराष्ट्रात भाजपच्या पायाखालील जमीन घसरली आहे. त्यामुळेच मोदी-शहा वारंवार येथे येत आहेत.'

कोल्हापूर : सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची दररोज मोडतोड केली जात आहे. सुडाचे व खूनशी राजकारण केले जात आहे. यापुढे संविधानाला धक्का लावाल तर प्रत्येक पायरीवर आम्ही लढाईसाठी सज्ज आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी (Dr. Vishwambhar Chaudhary) यांनी येथे दिला.

आरक्षण मागच्या दाराने हटविण्याचा प्रयत्न सुरू असून, महाराष्ट्र तोडणे हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. येथील ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित ‘निर्भय बना’ सभेत ते बोलत होते. त्यांनी देशातील सद्य:स्थितीवर सडेतोड भाष्य करत लोकांसमोरील आव्हानांचे विश्‍लेषण केले. आजच्या राजकीय स्थितीवर ताशेरे ओढत सत्ताधाऱ्यांच्या दांभिकतेवर टीका केली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) अध्यक्षस्थानी होते.

Nirbhay Bano Abhiyan Kolhapur Social Worker Vishwambhar Chaudhary
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘भाजप व संघाचा धोका हिंदूना आहे. कारण ते मूळ हिंदू उद्‌ध्वस्त करत आहेत. शिवछत्रपती व वारकरी संप्रदायाचा भगवा असून, तो आमचा भगवा आहे. राम ही त्यांची खासगी मालमत्ता नाही. आमचा राम शांत, कुटुंबवत्सल आहे. तो धनुष्य बाण घेऊन राग व्यक्त करणारा नाही. त्यामुळे राजकारणासाठी आम्ही राम कधीच वापरू देणार नाही. आम्ही हिंदू असून, त्यासाठी आम्हाला भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आपण वेळीच सावध झालो नाही तर यंदाच्या निवडणुका शेवटच्या असतील. ‘एक पक्ष एक नेता’ या वाटेवर पुढील वाटचाल असेल. भावी पिढ्यांचे भवितव्य ठरविण्याची हीच वेळ आहे.’’

ते म्हणाले, ‘‘संसदेला भारतीय संविधानाने सर्वोच्च केले आहे. त्याच संविधानाची मोडतोड केली जात आहे. गेली दहा वर्षे लोकांचे ऐकले जात नाही. मोदी (Narendra Modi) व शहांची लोकांत येण्याची हिंमत नाही. त्यांचा प्रेमावर विश्‍वास नसून, त्यांचे राजकारण द्वेषावर आधारलेले आहे. देशातील प्रत्येक नागरिकावर आजघडीला एक लाख ६० हजार रुपयांचे कर्ज आहे. कॉंग्रेसने जे सहा कायदे आणले, त्यांच्या बदल्यात दहा वर्षांत एकतरी कायदा सत्ताधाऱ्यांनी आणला का? उलट १५० खासदारांचे निलंबन करून त्यांचा आवाज दाबला. संसदेचे मूळ मालक लोक असून, सत्ताधारी पाच वर्षांसाठी तेथे भाडेकरू आहेत. धीर, संयम संपत असून, विखारी राजकारण केले जात आहे.’’

Nirbhay Bano Abhiyan Kolhapur
Nirbhay Bano Abhiyan Kolhapur

ॲड. असीम सरोदे म्हणाले, ‘‘चंपारण्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायानंतर त्यांना महात्मा गांधी यांनी न्याय मिळवू दिला, त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘निर्भय बनो’ चळवळ सुरू झाली. त्यानंतर आता आम्ही ही चळवळ सुरू करून नरेंद्र मोदी व अमित शहांविरोधात आवाज उठविला आहे. ‘निर्भय बनो’च्या सभांना प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून लोकांमधील मोदी-शहांविरोधातील राग दिसत आहे. देशातील जनतेला मोफत धान्य देतो म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींना हा कोणता विकास ? असा प्रश्‍न प्रत्येकाने विचारला पाहिजे.

महाराष्ट्रात भाजपच्या पायाखालील जमीन घसरली आहे. त्यामुळेच मोदी-शहा वारंवार येथे येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनेचे हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. शिवस्मारकावरून आपल्यावर केली जाणारी टीका चुकीची आहे. माझा शिवस्मारकाला विरोध नसून ते समुद्रात न करता इतरत्र करावे, इतकेच म्हणणे आहे.’’

Nirbhay Bano Abhiyan Kolhapur Social Worker Vishwambhar Chaudhary
आमचं काम पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, त्यामुळं ते शिव्याशाप देताहेत; मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार निशाणा

ते म्हणाले, ‘‘मोदी विज्ञान माहीत नसलेले, अंधश्रद्धा बाळगणारे व खोट्या पदव्या घेणारे आहेत. या अवैज्ञानिक व्यक्तीमुळे परदेशात भारताची बदनामी झाली आहे. ‘वन रँक वन पेन्शन’ बाबत त्यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला. त्यांच्या प्रत्येक राजकीय सभा या जनतेच्या पैशांतूनच होत असतात. या सर्वाला जनता कंटाळली आहे. यामुळे त्यांचे आता ४०० पार होण्याऐवजी ते हद्दपार होणार आहेत.’’

माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी विरोधकांनी एकमेकांत भांडत बसण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या फायली तयार कराव्यात, असे सांगितले. सरोज पाटील यांनी हुकुमशाहीला थारा द्यायचा नसेल तर मोदींना हरवूया, असे आवाहन केले. गिरीश फोंडे, ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार राजीव आवळे उपस्थित होते.

Nirbhay Bano Abhiyan Kolhapur Social Worker Vishwambhar Chaudhary
काँग्रेसला उमेदवारी डावलल्यास 2009 प्रमाणं 'जत पॅटर्न' राबवू; बड्या नेत्याचा स्पष्ट इशारा, नेमका काय आहे जत पॅटर्न?

प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य दुर्दैवी

सरोदे म्हणाले, ‘ॲड. प्रकाश आंबेडकरांचे भाजपसंदर्भातील विधान दिशाभूल करणारे आहे. त्यांचा गैरसमज झाला आहे की, संपूर्ण दलित समाज त्यांच्या बाजूने आहे; परंतु ते चुकीचे आहे. सध्याच्या परिवर्तनाच्या काळात अशा पध्दतीने दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे अयोग्य आहे.’’

डॉ. चौधरी म्हणाले..

  • - राष्ट्रपुरुषांची चरित्रे मलिन करून सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न

  • - सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर संघावर बंदी आणली असती

  • - हॉर्वर्डमध्ये शिकलेले मनमोहनसिंग मौनीबाबा, तर पदवी खोटी असणारे मोदी विश्‍वगुरू कसे?

  • - राहुल गांधी यांचा घाव मोदी व शहांना वर्मी बसला

Nirbhay Bano Abhiyan Kolhapur Social Worker Vishwambhar Chaudhary
कोकणात जांभ्या सड्यावर आढळली तब्बल 10 हजार वर्ष जुनी कातळशिल्पं; कुतूहल वाढवणाऱ्या प्रतिमांनी वेधलं लक्ष

मुश्रीफांना सवाल करण्याची वेळ

मुश्रीफांना भाजपकडे जाण्यासाठी मतदान दिले का, हे विचारण्याची वेळ आली आहे, असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ॲड. बाळासाहेब आंबेडकर धर्मांध शक्तींसोबत जाणार नाही, असा विश्‍वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com