esakal | तावडे हॉटेलजवळ कोल्हापूर- सोलापूर बस आगीत जळून खाक; प्रवासी सुखरूप
sakal

बोलून बातमी शोधा

आगीत एसटी बस खाक झाली.

तावडे हॉटेलजवळ कोल्हापूर- सोलापूर बस आगीत जळून खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : आज पहाटे शॉर्टसर्किटमुळे आगीत एसटी बस खाक झाली. यात एसटी बसचे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद चालक किरण विश्वासराव पाटील (जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलिसांत दिली.

हेही वाचा: पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर ; 21 बंधारे पाण्याखाली

आज पहाटेच्या सुमारास सोलापूर ते कोल्हापूर (बस एम एच ०६ एस ८४१३) बस तावडे हॉटेलजवळ चालकाचे बाजूस मागील चाकाजवळ अचानकपणे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग वाढत जाऊन अख्ख्या बसने पेट घेतला. एकूण चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. प्रवाशांना बाहेर काढल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. गांधीनगर पोलिसांत दाखल असून तपास हे़डकॉन्स्टेबल शिंदे करत आहेत.

loading image
go to top