तब्बल 760 शेतकऱ्यांची वीज बिलांतून मुक्तता; सौर कृषीपंपाचा वापर

बिलातून मुक्तता तसेच सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध; जागेची येत आहे अडचण
तब्बल 760 शेतकऱ्यांची वीज बिलांतून मुक्तता; सौर कृषीपंपाचा वापर

कुडित्रे : जिल्ह्यातील (kolhapur district) सुमारे साडेसहा लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांपैकी गेल्या दोन वर्षात ७६० शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा वापर केला. यामुळे वीज बिलांतून या शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहेच. शिवाय सिंचनासाठी दिवसा (irrigation) वीज मिळत आहे. शेतकऱ्यांना (farmers) सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांना तीन, पाच, व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषीपंप दिले आहेत.

पारंपरिक पद्धतीने कृषी पंपाची वीज जोडणी न झालेले व महावितरणकडे वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषी पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी या नवीन योजनेतून पारेषणविरहित नवीन वीज जोडण्या देण्यात येत आहेत. सौर कृषिपंपाच्या आधारभूत किमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती-जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे.

तब्बल 760 शेतकऱ्यांची वीज बिलांतून मुक्तता; सौर कृषीपंपाचा वापर
बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न; राधानगरीच्या दोघांना अटक

राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज महावितरणला मिळाले असून ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा भरणा केला आहे. तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वत: निवडसूचीतील पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ सौर कृषीपंप बसवण्यात आले असून पुणे प्रादेशिक विभागामध्ये ५ हजार ९७३ सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ७६० शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा वापर केला आहे.
सौर कृषी पंपासाठी ५ वर्ष व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च देखील शून्य आहे. या योजनेची माहिती महावितरणच्या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे.

१ लाख २४ हजारावर अर्ज नामंजूर

कागदपत्र अपुरी, जलस्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका ६० मीटरपेक्षा खोल असणे तसेच डिमांड नोट दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे राज्यात १ लाख २४ हजार ६९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश नदीवरून पाणी उपसा सिंचन केला जातो. पाऊस, पुराचे प्रमाण वाढल्यामुळे सौर कृषी पंप बसवणे अडचणीचे ठरत आहे.

तब्बल 760 शेतकऱ्यांची वीज बिलांतून मुक्तता; सौर कृषीपंपाचा वापर
महत्वाची बातमी - शिष्यवृत्तीचे वेळापत्रक पुन्हा बदलले

"शेतीचे तुकडे पडल्यामुळे सौर कृषी पंपांना जागा अपुरी असून मागणी कमी आहे. शासनाने गायरान ताब्यात घेऊन एकत्रित सौर ऊर्जा प्रकल्प धोरण राबवत महावितरणला वीज द्यावी आणि महावितरण कडून शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा वीज मिळावी."

- विक्रांत पाटील, अध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com