Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Summary

मृत तुकाराम मगर व मुलगा प्रकाश मगर यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. अनेक वेळा त्यांच्यातील वाद स्थानिक पातळीवर सोडवण्यात आले होते.

धामोड : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. ही घटना काल ‘सावरमाळ’ नावाच्या शेतामध्ये उघडकीस आली. तुकाराम दौलू मगर (वय ६५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नातू आकाश आनंदा मगर याने चुलत्यांच्या विरोधात राधानगरी पोलिसांत (Radhanagari Police) फिर्याद दिली आहे. घरगुती वादातून ही खुनाची घटना घडली.

Kolhapur Crime News
Satara Lok Sabha : कराड तालुक्यातील विमानतळाजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात; तीन पोलीस कर्मचारी जखमी

याप्रकरणी संशयित प्रकाश मगर याला राधानगरी पोलिसांनी अटक केली. याबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील तुकाराम मगर व मुलगा प्रकाश यांच्यामध्ये दोन दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. यातूनच दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी (ता. ६) तुकाराम मगर हे ‘सावरमाळ’ नावाच्या शेताकडे गेले होते. यावेळी मुलगा प्रकाश याने भांडणातील रागापोटी दोरीने गळा आवळून वडील तुकाराम यांचा खून केला.

काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नातू आकाश मगर याने पोलिसांत फिर्याद दिली. संशयित आरोपी प्रकाश मगर याने वारंवार होणाऱ्या भांडणाचा राग मनात ठेवून वडिलांचा गळा आवळून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार राधानगरी पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकूर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी संशयित प्रकाश मगर याला अटक केली. या घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक महेश घेरडीकर, हेड कॉन्स्टेबल खामकर, कृष्णात यादव अधिक तपास करत आहेत.

Kolhapur Crime News
18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

परिसरात दिवसभर चर्चा

राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील केळोशी बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या गावात नऊ वाड्यावस्त्यांचा समावेश होतो. या परिसरात वडिलांचा मुलाकडून खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. परिसरात दिवसभर याच घटनेची चर्चा होती.

वादाचे पर्यवसान खुनात

मृत तुकाराम मगर व मुलगा प्रकाश मगर यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. अनेक वेळा त्यांच्यातील वाद स्थानिक पातळीवर सोडवण्यात आले होते. किरकोळ कारणाने होत असलेल्या वादाचे पर्यवसान अखेर खुनात झाल्याने ग्रामस्थांना धक्का बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com