यंदा ढोलताशांचा दणदणाट शांतच 

The sound of drums is quiet this year
The sound of drums is quiet this year
Updated on

कोल्हापूर  : एरव्ही जून-जुलै आला की, ढोल-ताशांचा कडकडाट कानी पडायचा. गणेशोत्सवासाठी सरावाच्या तालमी व्हायच्या. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने ढोल-ताशा पथकांचे अर्थकारण बदलून गेले आहे. सरावासाठी बंदी आहेच; पण सराव सुरू करूनही मिरवणूक निघणार नसेल तर तो करून उपयोग काय? असा प्रश्‍न पथकातील कलाकारांना पडला आहे. 

मुंबई-पुण्यातील मिरवणुकांत अशा पथकांचा आवर्जून समावेश होतो. कोल्हापुरात पाच-सहा वर्षांपासून क्रेझ निर्माण झाली. दिवसभरातील आपआपले उद्योग-व्यवसाय तसेच नोकरी सांभाळून ज्यांना वादनाचा छंद आहे, अशी मंडळी एकत्रित येऊ लागली. एका पथकात दीडशे ते दोनशे कलाकारांचा सहभाग असतो. तीन तासांची मिरवणूक असेल तर सुमारे 90 हजार रुपये पथकाकडून घेतले जातात. 


कोविडच्या काळात दहा लोकांपेक्षा अधिक जण एकत्रित येण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात पथके शांत राहिली. जून उजाडला तसे सरावाचे वेध लागले. मात्र, लॉकडाउन वाढला आणि सराव सुरू होण्याची चिन्हे काही दिसेनात. 
ढोल पथकात शारीरिक आणि मानसिक एकाग्रता महत्त्वाची असते. डाव्या हाताची थापी पडल्यानंतर "छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा आवाज गगनभरारी घेतो आणि अंगावर रोमांचे उभे राहतात. ढोल वादनात एक ते सात हात महत्त्वाचे मानले जाते. मराठी बाणा जपत कलाकार आपली कला दाखवितात; मात्र त्यामागे सरावातील बारकावे महत्त्वाचे ठरतात. शहरात शाहू गर्जना, करवीर गर्जना, करवीर नाद, महालक्ष्मी प्रतिष्ठान, आम्ही कोल्हापुरी, स्वराज्य ढोल अशी पथके आहेत. 

ढोल-ताशा पथकांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. गणेशोत्सवात पथकांना मागणी असते. कोरोना तसेच लॉकडाउनमुळे सराव पूर्णपणे थांबला आहे. सराव सुरू करून पुढे परवानगीच मिळाली नाही तर सराव सुरू करून उपयोग काय, असाही प्रश्‍न आहे. तूर्तास "वेट ऍन्ड वॉच'च्या भूमिकेत आहोत. 
- उदय पोतदार, संस्थापक सदस्य, शाहू गर्जना ढोल पथक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajendra Yadravkar Sainik Takali MIDC black flag shirol
Kolhapur 10 Km Flyover Project Details
Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Marathi News Esakal
www.esakal.com