

SP action against corrupt police officer Kolhapur
esakal
SP Takes Direct Action Against Policeman : शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैशांची मागणी केल्याप्रकरणी पोलिस अंमलदार शैलेश पाटील याला आज निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी एक पथक पाठवून प्रकरणाची शहानिशा करत ही कारवाई केली. त्या पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांचीही खातेअंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या कारवाईने शाहूवाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली.