

Three killed after Innova car hits pedestrians in Kolhapur
esakal
Innova Car Accident Kolhapur : पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल चौक परिसरात पहाटे सुमारे पाचच्या सुमारास भरधाव इनोवा कारने तिघा जणांना चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातात तिघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर शाहूपुरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दिलीप आण्णाप्पा पवार (६५, वळीवडे रोड, गांधीनगर) सुधीर कमलाकर कांबळे (४१, आटपाडी, सांगली), विनय सिंग गौड (२७, मध्यप्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.