
कोल्हापूर : जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरावर प्राविण्यप्राप्त खेळाडूंना इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. यावर्षी जिल्ह्यातील एक हजार ८३ शाळांमधील १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक व रोजगार संधींसाठी हे प्रमाणपत्र निर्णायक ठरणार आहे.