Kolhapur Accident : कोल्हापूर जिल्ह्यात एसटी अपघातांचा धोका; ७७ ब्लॅकस्पॉट ठरताहेत मृत्यूचे कारण
77 Blackspots Behind ST Bus Accidents : कोल्हापूर जिल्ह्यातील ७७ ब्लॅकस्पॉटमुळे एसटी अपघातांचा धोका वाढला; प्रशासनाचा धोकादायक ठिकाणांवर अहवाल, यंदा ९३ एसटी अपघातांत ९ मृत्यू, ७० जखमी; चालकांची चूक आणि अरुंद रस्ते प्रमुख कारण
कोल्हापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागात एसटीच्या अपघातास जिल्ह्यातील ७७ ब्लॅकस्पॉट कारणीभूत ठरले आहेत. यंदा एसटीचे एकूण ९३ अपघात घडले असून, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.