घाटमाथ्यावरील महाराष्ट्र, कर्नाटक व घाटाखालील कोकण, गोव्याला जोडणारा तिलारी घाट हा सर्वांत जवळचा मार्ग आहे.
चंदगड : कोल्हापूर विभागीय (Kolhapur Division) वाहतूक नियंत्रकांनी परवानगी दिल्यामुळे तिलारी घाटातून (Tilari Ghat) बुधवार (ता. २) पासून एसटी वाहतूक सुरू होणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर एसटी सुरू होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.