कागल तालुक्‍यात एसटी फुल्ल, पण मालवाहतुकीने 

ST full in Kagal taluka, but by freight
ST full in Kagal taluka, but by freight
Updated on

कागल : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर थांबलेल्या कागल एसटी आगाराचे गेल्या शंभर दिवसात तब्बल नऊ कोटी रूपयाचे नुकसान झाले. आगाराच्या दैनंदिन 850 फेऱ्या होतात. त्यातून आगाराला सरासरी आठ ते नऊ लाखाचे उत्पन्न मिळते. अद्याप एसटी पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी लालपरी मालवाहतूकीकडे वळली आहे. विश्‍वासार्हतेमुळे व्यापाऱ्यांचा माल वाहतुकीसाठीचा कल लालपरीकडे वाढत चालला आहे. 

22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पासून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याला शंभर दिवस झाले. या काळात एसटीचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले. ग्रामीण आगारामध्ये "टॉप फाईव्ह'मध्ये कागल आगाराचे नाव आहे. दैनंदिन 850 फेऱ्या करत 820 गावखाते सांभाळणाऱ्या कागल आगाराचे कोरोना काळात सुमारे नऊ कोटीचे नुकसान झाले. 
सध्या आगाराच्या केवळ कागल-रंकाळा व कागल-इचलकरंजी अशा दोनच मार्गावर वाहतूक सुरू आहे. मुरगुड मार्गावर सोडण्यात आलेल्या बसेसना प्रतिसाद मिळाला नाही. प्रवाशांची दक्षता घेत कागल आगाराने सुरक्षीतता जपली आहे. यासाठी एसटी बस व आगारात स्वच्छता मोहीम राबविली आहे. 

उत्पन्न वाढीसाठी एसटीने अनेक पर्याय तपासले. त्यातून मालवाहतूक हा पर्याय पुढे आला. मालवाहतुकीसाठी एसटी महामंडळाचा तीन हजार एसटी ट्रक बांधण्याचा मानस आहे. सध्या जिल्ह्याला तीस ट्रक प्राप्त झाले आहेत. त्यातील आगाराला सात ट्रक मिळाले आहेत. या सातही ट्रकना माल वाहतुकीसाठी मोठी मागणी आहे. औषधे, सोयाबीन, शेती औजारे व खते आदी वाहतूकीसाठी या ट्रकची मागणी वाढत आहे. गेले महिनाभर या ट्रकचे बुकींग हाऊसफुल्ल आहे. 

खाजगी माल वाहतुकीमध्ये टनावर दर असतो. एसटीचा दर किलोमीटरवर आहे. खाजगी वाहतुकीपेक्षा एसटीचा 35 रूपये किलोमीटर हा दर परवडणारा आहे. प्रवाशी वाहतुकीसाठी बावीस प्रवाशी मर्यादा असली तरी आहे त्याच भाड्यात प्रवाशी नेले जात आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी गाड्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. गैरसमज न करता प्रवासासाठी व मालवाहतुकीसाठी एसटीचा वापर करावा. 
- प्रकाश शिंदे, आगार व्यवस्थापक, कागल आगार 


व्यापारी, कारखानदार मंडळींसाठी सुरू केलेली मालवाहतूक बस हा परिवहन मंडळाचा उपक्रम चांगला आहे. यामुळे आमचा प्रवासी वाहतूक खर्च निम्म्याने कमी झालेला आहे. एसटी देत असलेली सेवादेखील उत्कृष्ट आहे. यापूढे परिवहन मंडळाचे सहकार्य असेच राहू दे. 
- सागर पाटील, सोयाबीन व्यापारी, नानीबाई चिखली 


दृष्टिक्षेप 
- कागल एसटी आगाराचे 9 कोटींचे नुकसान 
- मालवाहतुकीसाठी एसटीचा तीन हजार ट्रक बांधण्याचा मानस 
- जिल्ह्याला 30 तर कागल तालुक्‍याला 7 ट्रक प्राप्त 
- महिनाभर ट्रकचे बुकींग हाऊसफुल्ल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com