Bus Service for Election : निवडणूक कामासाठी एसटी रवाना ; मतदानादिवशी उपलब्ध बसेसमधून प्रवासी सेवा

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने एसटी महामंडळाकडून एसटी बस गाड्या मागवल्या आहेत. १०२ बस गाड्या निवडणूक कर्तव्यावर गेल्या. उद्या (सोमवार) दुपारी दोनपासून उर्वरित बस गाड्या निवडणूक कर्तव्यावर जाणार आहेत.
Bus Servic
Bus Servicsakal

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने एसटी महामंडळाकडून एसटी बस गाड्या मागवल्या आहेत. १०२ बस गाड्या निवडणूक कर्तव्यावर गेल्या. उद्या (सोमवार) दुपारी दोनपासून उर्वरित बस गाड्या निवडणूक कर्तव्यावर जाणार आहेत. मतदाना दिवशी मंगळवारी (ता. ७) एसटी प्रवासी वाहतुकीसाठी मोजक्याच असणार आहेत.

निवडणूक विभाग, पोलिस प्रशासनाने एसटी महामंडळाकडे ४७१ बसची मागणी केली होती. गरजेनुसार काही गाड्या एनवेळी वापरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पोलिसांना बंदोबस्ताला आणण्यासाठी एसटीच्या सहा बस रवाना झाल्या. सोमवारी मतदान मशीन व मतदान पूरक साधनसामुग्री विविध गावांत पोहचविण्यासाठी एसटीच्या ४०० गाड्या जाणार आहेत. सोमवारी दुपारी बारापासून जाणाऱ्या एसटी सायंकाळी पुन्हा बसस्थानकांवर परत येतील. त्या प्रवासी सेवा देतील.

Bus Servic
Loksabha Election Voting : मतदानासाठी उद्या कामगारांना पगारी सुट्टी

त्यानंतर मंगळवारी दुपारी तीननंतर पुन्हा मतदान मशीन व कर्मचाऱ्यांना घेऊन येण्यासाठी परत जातील, त्या बस रात्री उशिरा परत येणार आहेत. यानुसार मंगळवारी जिल्हाभरात मतदानासाठी स्थानीक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी असली तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवासी संख्या असणार आहे.

त्यामुळे अन्य जिल्ह्यातील एसटी बस तसेच कर्नाटक एसटी बसनेचे प्रवास करावा लागणार आहे. जिल्ह्यातील सर्वच ११ आगारातील बस निवडणुकीत कामात आहे. त्यानुसार मतदाना दिवशी फक्त ज्या मार्गावर प्रवासी संख्या जास्त आहे, अशाच मार्गावर एसटीचा प्रवास सुरू राहणार आहेत.

एसटी महामंडळाकडे जिल्हा निवडणूक विभागाने केलेल्या मागणीनुसार बस पुरविल्या आहेत. मतदानादिवशी नियमित प्रवासी सेवेसाठी गाड्या कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्या दिवशी स्थानिक सुटी असल्याने प्रवासी संख्याही कमी असते. त्यामुळे जेवढ्या गाड्या उपलब्ध असतील त्यातून नियमित प्रवासी सेवा सुरू राहणार आहे.

- संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com