ST Strike - कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच राहणार

एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्यानं प्रवासी वाहतूक बंदच

कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - एसटी आंदोलन कामगारांनी उभं केलं आहे, त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा, असं म्हणत आझाद मैदानावरचं आंदोलन तात्पुरतं मागे घेत असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalakr) आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत (sadabahu khot) यांनी दिली. (st strike in maharashtra) राज्यभरातलं आंदोलन मागे घ्यायचं की तसंच ठेवायचं हे कर्मचाऱ्यांनी ठरवावं असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या स्थानिक एसटी कामगारांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. (ST protest)

हेही वाचा: ST Strike - मुंबईसह कोल्हापुरात संपाचा पेच कायम

दरम्यान, कोल्हापुरात एसटी कामगारांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संप सुरु असलेल्या ठिकाणी कर्माचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक हे, कोण म्हणतयं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एसटीच राज्य शासनात विलीनीकरण झालचं पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी काही काळासाठी परिसारातील वातावरणात तणाव निर्माण झाला. यावेळी मोठ्या संख्येने कर्माचारी आणि अधिकारी उपस्थित होते. (kolhapur emplyees st strike)

दरम्यान, विलीनीकरण झाल्यावर आमचा प्रश्न सुटेल, अशी कामगारांची भावना निर्माण झाली होती. त्या भावनेतूनच संघटनेशिवाय कामगारांनी संप पुकारला. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहिलो, अशी प्रतिक्रीया भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिली आहे. मात्र कोल्हापुरात एसटी कर्मचारी संप सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट करत आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा: जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

loading image
go to top