
कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’ पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर गोवा बनावट मद्याची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. सीमावर्ती भागात सहा ठिकाणी तपासणी नाके, शहरात गस्तीसाठी ९ भरारी पथके तैनात केली आहेत. विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन न करण्याचे आवाहनही राज्य उत्पादनच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे.