esakal | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय तर वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Stopping of vehicles other than essential services from Maharashtra to Karnataka

कोगनोळीत बंदोबस्त : केवळ 'इमर्जन्सी'साठी मुभा

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय तर वाचा...

sakal_logo
By
अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) - महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहने सोडणे बंद केले आहेत. अजमेरहून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होताच कोगनोळी सीमा नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणे अवघड झाले आहे.
सीमेलगतच असणाऱ्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, चंदगड, आजरा, उत्तूर यासह महाराष्ट्रातील अन्य भागात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

वाचा - बंबई से आया मेरा दोस्त... दूर से सलाम करो !

सीमाभागातील लोक महाराष्ट्रात गेले असता कोणत्या कारणाने गेले, अत्यावश्यक कारणाने गेले असतील तर त्यांना परत कर्नाटकात घेण्यात येत आहे.
या कर्नाटक-महाराष्ट्र पोलिस सीमा तपासणी नाक्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांना मोठी अडचण निर्माण होत आहे.

रोज २५० ते ३०० वाहने परत

महाराष्ट्रातून कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात जाण्यासाठी अनेक वाहने कोगनोळी तपासणी नाक्यावर येत आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवा वगळता रोज २५० ते ३०० वाहने कर्नाटक पोलिसांकडून परत पाठवण्यात येत आहेत.
 

'कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोगनोळी नाक्यावर बंदोबस्त कडक केला आहे. येथून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वाहने सोडण्यात येत आहेत.'
- बी. एस. तळवार,
उपनिरीक्षक, निपाणी ग्रामीण पोलिस ठाणे

loading image
go to top