
कोल्हापूर : कृत्रिम रंग किंवा अतिरासायनिक घटक वापरून फळ पिकवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. आरोग्यास घातक रंग किंवा रसायनाचा वापर केला जाऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा आयुक्तांनी फळ पिकवणाऱ्या, विकणाऱ्या व्यवसायांची अचानक तपासणी करावी. योग्य तेथे कारवाई करावी, अशा सूचना केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे शुद्ध फळांच्या उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.