Shaktipeeth Highway : मुश्रीफांसमोरच शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; सामूहिक आत्महत्येचा दिला इशारा

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) तीव्र विरोध आहे.
Nagpur-Goa Shaktipeeth Highway Hasan Mushrif
Nagpur-Goa Shaktipeeth Highway Hasan Mushrifesakal
Summary

शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. जिल्ह्यातील ५९ गावांमधून हा मार्ग जातो.

गोकुळ शिरगाव : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) तीव्र विरोध आहे. या बदल्यात सांगली फाटा-कागल-निढोरी-मुरगूड असा पर्यायी मार्ग काढावा; अशा भावना कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी (Farmers) व्यक्त केल्या. हनुमान मंदिरात बैठक झाली. याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर तर सामूहिकरित्या आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

यादरम्यान गतवर्षी झालेल्या समृद्धी महामार्गाचा गावकऱ्यांना काहीच उपयोग झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. जिल्ह्यातील ५९ गावांमधून हा मार्ग जातो. त्यापैकी एक कोगील बुद्रुक. या गावातील ६४ शेतकऱ्यांची एकूण १७० एकर बागायत जमीन या महामार्गाखाली जाणार आहे. याबाबतचा नकाशाही प्रसिद्ध झाला आहे.

Nagpur-Goa Shaktipeeth Highway Hasan Mushrif
Sangli Tourism : दंडोबा-गिरलिंग बनेल शिव-शक्तिपीठ; 'ही' प्राचीन स्थळे होतील जिल्ह्याची ठळक ओळख

महामार्गामुळे नदी किनारा ते कोगील बुद्रुकपर्यंत पाच कोटी रुपये खर्च करून आणलेली पाणी योजना बंद पडून शेतकऱ्यांची बागायत जमीन जाणार आहे. यासोबतच काही शेतकऱ्यांमध्ये शेतजमिनीसोबत घरेही जाणार आहेत. शक्तिपीठ मार्गास विरोध म्हणून गावकऱ्यांनी गावाच्या प्रमुख प्रवेशद्वारापाशी निषेध दर्शविणारा डिजिटल फलकही लावला आहे. या महामार्गाचा विरोध म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ठराव देण्यात आलेला आहे.

Nagpur-Goa Shaktipeeth Highway Hasan Mushrif
कर्जमाफीत तब्बल 36 हजार शेतकऱ्यांवर अन्याय; तीन वर्षांतून एकदा कर्ज घेत परतफेड केलेले अनुदानापासून वंचित

शक्तिपीठामुळे गावातील १७० एकर बागायत जमीन तसेच गावची  पाण्याची योजना बंद होईल. शेतजमीन गेल्यामुळे गावातील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, या शक्तिपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे.

-रामगोंड पाटील, माजी पोलिसपाटील

होणाऱ्या महामार्गामुळे माझी स्वतःची सहा एकर बागायती जमीन घरासह जाणार आहे. माजी उपजीविका संपूर्णपणे शेतीवर आहे. महामार्गामुळे माझे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे यावर पर्यायी मार्ग काढून महामार्ग करण्यात यावा.

-बळवंत पाटील, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com