

Kolhapur Student End Life family dispute
esakal
Shocking incident Kolhapur : वडील आणि भावानेही गाडीवरून कॉलेजला सोडले नसल्याच्या कारणावरून आज विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. साईराज पांडुरंग हुंबे (वय १८, रा. आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात तो ‘सिव्हिल डिप्लोमा’च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. याची नोंद सीपीआर पोलिस चौक, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.