12th Exam Results : बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेऊन संपवले जीवन; ती दोन दिवसांपासून होती निराश

Radhanagari Police Case : साधना ही पनोरे (ता. पन्हाळा) येथील एका कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होती. नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तिला ४८ टक्के गुण मिळाले.
Radhanagari Police Case
Radhanagari Police Caseesakal
Updated on

धामोड : कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील साधना पांडुरंग टिंगे (वय १८) हिने बारावीच्या परीक्षेत (12th Exam Results) कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद दगडू टिंगे यांनी राधानगरी पोलिसांत (Radhanagari Police) दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com