Government Grant For Dairy Farmers: गाय, म्हैस खरेदीसाठी हवे अनुदान; रोजगार निर्मितीला चालना मिळेल : राज्याला मिळू शकेल पुरेसे दूध
Dairy Farming Subsidy Scheme : पर्यावरणपूरक असणाऱ्या जिल्ह्यातील पशुधन वाढवण्यासाठी गोकुळ, वारणा दूध संघाप्रमाणे शासनानेही म्हशी खरेदीसाठी ठराविक रकमेचे अनुदान दिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पशुधन घेता येईल. तरुणांनाही दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी मदत होईल.
कोल्हापूर : राज्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधन वाढवले पाहिजे. म्हैस दुधाला मोठी मागणी आहे. मात्र मागणीनुसार म्हैस दुधाचा पुरवठा होऊ शकत नाही. यासाठी शासनाने पशुधन वाढीसाठी विशेष कार्यक्रम घेतला पाहिजे.