इचलकरंजी - SB गॅंग म्होरक्या सुदर्शन बाबरला डबल मोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

इचलकरंजी - SB गॅंग म्होरक्या सुदर्शन बाबरला डबल मोका

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : एसबी गॅंगचा म्होरक्या कुख्यात गुंड सुदर्शन बाबर याला डबल मोका लागला आहे. तसेच गॅंगमधील संतोष जाधव खून प्रकरणी अटक केलेल्या अन्य 7 जणांवर मोका कारवाई करण्यात आली आहे. पहिल्या मोकातून बाहेर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी बाबर याला जाधव खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांनतर पोलिसांनी बाबर गँगवर मोकाच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या. पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडून पाठवलेल्या एस. बी. गॅंगवर मोका प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली. शहरातील एका कुख्यात गुंडावर डबल मोका लागल्याने आता इतर गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: 'पार्ट टाइम मुख्यमंत्री' या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

सुदर्शन बाबरविरोधी अनेक गंभीर गुन्हे विविध ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गँगविरोधी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षकानी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायद्यान्वये कारवाई करून अटक केली होती. यामधून तो काही महिन्यांपूर्वी बाहेर आला. जवाहर नगर येथील संतोष जाधव खून प्रकरणी त्याला काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर गुंडा बाबर गॅंगवर पुन्हा मोका कारवाईच्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली गतिमान केल्या. अखेर मंगळवारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुदर्शन बाबर गॅंगवरील मोका प्रस्तावाला मंजुरी मिळाली. गुंड सुदर्शन बाबर याच्या डबल मोकाची कारवाई झाली आहे.

हेही वाचा: '...हे गुजरातमध्ये होऊ शकतं, मग महाराष्ट्रात का नाही?'

loading image
go to top