Raju Shetti : हंगामातील 400 रुपये द्या, अन्यथा ऊसतोडी बंद पाडणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्पष्ट इशारा

साखर कारखानदारांनी (Warana Sugar Factory) मागील हंगामातील चारशे रुपये द्यावे.
Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari Sanghatanaesakal
Summary

वेगवेगळ्या प्रकारे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरु आहेत.

घुणकी : ‘आज ऊस तोडणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना फूल देऊन ऊस तोडणी बंद करण्याचे आवाहन केले आहे. उद्यापासून जर ऊस तोडणी चालूच राहिली तर बंद पाडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी वठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे दिला.

साखर कारखानदारांनी (Warana Sugar Factory) मागील हंगामातील चारशे रुपये द्यावे व या हंगामातील दर जाहीर करावेत मगच कारखाने सुरू करावेत, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरु आहेत.दरम्यान, कारखाना परिसरातील गावांमध्ये ऊसतोडी सुरू केल्या होत्या. याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

Swabhimani Shetkari Sanghatana
Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्राच्या 'या' मागणीमुळं 'कोयना' सापडणार दुहेरी संकटात; राज्यालाही फटका बसण्याची शक्यता

जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पेठ वडगाव येथे एकत्र आले. वारणा कारखाना परिसरातील भादोले, किणी, घुणकी, चावरे, पारगाव, निलेवाडी, अमृतनगर, पारगाव, मनपाडळे, पाडळी, अंबप, वठार तर्फ वडगाव परिसरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरू होती, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना फूल देऊन ऊस तोडणी बंद करण्याचे आवाहन केले.

Swabhimani Shetkari Sanghatana
Murugesh Nirani : काँग्रेस सरकार कधीही पडू शकतं, 50 आमदार भाजपच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

काही ठिकाणच्या ऊस तोड बंद केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, रॅलीची सांगता वठारतर्फ वडगाव येथे झाली. यावेळी धनाजी पाटील, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, शिवाजी पाटील, सत्वशील जाधव, शिवाजी आंबेकर, सुनिल सुर्यवंशी, सुनील पचिंबरे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com