घुणकी : गावागावांत तीन ते चार चिटबॉय असतानाही ऊसतोडणीवर मात्र मुकादमांचेच राज्य सुरू आहे. मुकादम सांगेल त्याच शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीची पावती द्यायची, अशी व्यवस्था सध्या रूढ झाली आहे. .या यंत्रणेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अक्षरशः भरडला जात असून, याबाबत चिटबॉय आणि शेती अधिकाऱ्यांचे मात्र तोंडावर बोट असल्याचे चित्र आहे. या कुचकामी ऊस तोडणी यंत्रणेवर अंकुश कोण ठेवणार, असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे..कोकणी ऊसाच्या गोडीत नव्हे, चिंतेत वाढ.ऊस तोडणी हंगाम साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन मार्चपर्यंत चालतो. प्रत्येक गावात तीन ते चार साखर कारखान्यांच्या तोडणी यंत्रणा कार्यरत असतात, मात्र कारखान्यांशी एकनिष्ठ असलेले सभासद ऊस उत्पादक शेतकरी अन्य कारखान्याला ऊस पाठवू शकत नाहीत..याचाच गैरफायदा घेत मुकादम शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करत आहेत. याकडे लक्ष द्यायला मात्र कोणालाच वेळ नाही. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे का द्यावेत, असा उलट सवाल उपस्थित होत असला तरी पीककर्ज, बँका, पतसंस्था व सावकारांकडील कर्जाचा तगादा असल्याने शेतकरी ऊस गाळपासाठी पाठवण्याची घाई करतो..शिवाय ऊस लवकर गेल्यास गहू, खपली, हरभरा यासारखी रब्बी पिके घेता येतात. या भावनेपोटी शेतकरी चिटबॉय आणि मुकादमांच्या मागे फिरत राहतो. १५ मे २०२५ पासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल्याने शेतकऱ्यांना ऊस पिकावर खत मात्रा देणे व आंतरमशागत करणे शक्य झाले नाही. परिणामी ऊस उत्पादनात मोठी घट झाली. .शेतकऱ्यांच्या माथी वाढीव खर्चाचा भुर्दंड.त्यातच पावसामुळे ऊस तोडणी नोव्हेंबरच्या मध्यावरच सुरू होऊ शकली. पूर्वी साखर कारखान्यांच्या नियमानुसार नोंदीप्रमाणे ऊस तोडणी होत होती. अडसाली उसाची (गतवर्षी मे ते ऑगस्टमधील लागण) प्रथम तोडणी केली जात असे. .चिटबॉयने दिलेल्या पावतीनुसारच मुकादम मजूर पाठवत आणि तोडणी होत असे. त्यानंतर जानेवारीपासून खोडवा पिकाची तोडणी केली जात होती. हा प्रघात पन्नास वर्षे सुरू होता. मात्र, गेल्या काही वर्षांत सहकारी व खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढली, तसेच २,५०० टनांवरून १० हजार टनांहून अधिक गाळप क्षमतेचे विस्तारीकरण झाले. .मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याने गाळप सुरू होताच ट्रॅक्टरचालक व मुकादमांच्या मर्जीनुसार ऊस तोडणी सुरू होत असल्याचे चित्र आहे. मुकादम रस्त्यालगतची, सोयीची शेते पाहून ऊस तोडणी करतात. प्रत्यक्षात तोडणी व वाहतुकीसाठी प्रतिटन मजुरी मिळते, तसेच हंगामाच्या शेवटी प्रतिटन कमिशनही मिळते. .असे असतानाही तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून एकरी सुमारे चार हजार रुपये घेतात. शेतातून वाहन न निघाल्यास प्रत्येक खेपेसाठी अन्य ट्रॅक्टर ओढण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये, किमान सहा वेळा ट्रॅक्टर घेतल्यास तीन हजार रुपये, चालकाच्या जेवणासाठी प्रति खेप ३०० रुपये, चहा-पाणी व कधी नाश्ताही द्यावा लागतो. .तेव्हाच कुठे ऊस कारखान्यात पोहोचतो. सध्या ऊस तोडणी क्षेत्रावर मुकादमांचेच राज्य असून, त्यांच्या मर्जीनुसारच चिटबॉय तोडणी पावत्या देतात. काही मुकादम शेतकऱ्यांनाच स्वतः ऊस तोडायला लावून तो ऊस घेऊन जातात, तरीही शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात..यावर साखर कारखान्यांनी ठोस पर्याय काढण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात शेतकरी ऊस लागवडीपासून दूर जाण्याची भीती व्यक्त होत आहे..उसाची वाढ खुंटली, तण वाढले..!मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस तब्बल सहा महिने न थांबल्याने शेतकऱ्यांना खत देणे व आंतरमशागत करता आली नाही. परिणामी उसाची वाढ खुंटली असून, तणांचे साम्राज्य पसरले आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे..शेतकऱ्यांना ऊस तोडणी मजूर लुटत आहेत. ऊस तोडणी खर्च दहा हजार रुपयांवर जातो. हा खर्च उत्पादन खर्चात धरण्याची वेळ आली आहे. यावर केवळ साखर कारखान्यांनी अंकुश ठेवण्याची गरज आहे.- सुधीर मगदूम, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.