Maharashtra Sugarcane Farmers Demand 5000 Rupees Per Tonne as Sugar Factories Offer 3850 Rupees in Jaysingpur Meeting
sakal
जयसिंगपूर : यंदा तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३८५० रुपये तर साखरेच्या प्रतिकिलो ४५ रुपयांहून अधिक वाढणाऱ्या दरानुसार जादाची रक्कम हंगाम संपल्यानंतर देण्याबाबतचा तोडगा शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील साखर कारखानदारांनी पुढे आणला. मात्र, शेतकरी संघटनांनी याला विरोध दर्शवत प्रतिटन पाच हजार रुपयांच्या दरावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याने जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवार (ता.एक) रात्री उशिरा झालेली संयुक्त बैठक निष्फळ ठरली.