कोल्हापूर - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने यंदा उसाचे आणि पर्यायाने साखरेचे उत्पादन घटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल साडेआठ लाख टन उसाचे कमी गाळप झाले आहे, तर साखर उत्पादनात १३ लाख २९ हजार क्विंटलने घट झाल्याचे दिसून येत आहे.