या अडीच महिन्यांच्या कालावधीत १६ सहकारी साखर कारखान्यांनी ७२ लाख ७३ हजार १०५ मे. टन उसाचे गाळप करून ८१ लाख ११ हजार ७९४ क्विंटल साखर पोती उत्पादित झाली आहेत.
असळज : कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी (Kolhapur Sugar Factory) चार फेब्रुवारीअखेर ९८ लाख ३५ हजार ८७३ मे. टन उसाचे गाळप करून एक कोटी ८ लाख ८७ हजार २४१ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.११ आहे.