राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सध्या ८.१५ टक्के साखर उतारा आहे. याउलट सर्वांत कमी ६.३२ टक्के साखर उतारा अहमदनगर जिल्ह्याचा आहे.
कोल्हापूर : अनेक अडचणींवर मात करत कोल्हापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम (Sugarcane Season) सुरू झाला आहे. साखर उताऱ्यामध्ये राज्यात कोल्हापूर (Kolhapur) आघाडीवर असून सध्या ८.१५ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे (वारणानगर), कुंभी- कासारी (कुडित्रे), दत्त दालमिया (आसुर्ले-पोर्ले), जवाहर शेतकरी (इचलकरंजी) या साखर कारखान्यांचा उतारा १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.