

Farmers inspect sugarcane seedlings at a nursery amid rising demand.
sakal
जयसिंगपूर : गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात जाणवलेल्या थंडीमुळे ऊस कांडी लावणीच्या उगवणीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याने कांडी उगवण मंदावली असून, काही ठिकाणी कांडी कुजणे, उगवण असमान राहणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात ऊस लागवडीसाठी पारंपरिक कांडी लावणीपेक्षा रोप पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल लक्षणीयरीत्या वाढला आहे.