शेतकऱ्यांनी (Farmers) स्वत:हून ऊसतोड करावी, असे अनेक कारखान्यांकडून आवाहन केले जात आहे.
कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा (FRP) जास्त दर मिळेल की, नाही हे शेतकऱ्यांना माहिती नाही. मात्र, साखर कारखान्यासाठी (Sugar Factory) ऊसतोड करणाऱ्या ऊसतोड मजुरांकडून प्रतिटन उसामागे १०० रुपये सक्तीने घेतले जात आहेत. एकीकडे ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि ज्यांची चाळीस ते पन्नास टनांपेक्षा जास्त ऊसतोड होत आहे, अशा शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.