सावधान : विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त

कडेकोट बंदोबस्त; संचारबंदीचा भंग केल्यास गय नाही
curfew
curfew

कोल्हापूर: संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रमुख चौकात नाकाबंदीसह गस्तीद्वारे पोलिसांचा जिल्ह्यावर वॉच ठेवण्यात येणार आहे. दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यात आज रात्री आठपासून संचारबंदी सुरू झाली. त्यासाठी शहरासह जिल्ह्यात बंदोबस्त तैनात केला. जिल्ह्यात दोन हजार पोलिसांसह सहाशे होमगार्डची मदत घेतली आहे. शहरासह इचलकरंजीवर विशेष लक्ष आहे. त्यासाठी १४ ठिकाणी नाकाबंदी व मोबाईल गस्ती वाहनांची मदत घेतली जाणार आहे.दरम्यान गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये शहरात विनामास्क फिरणाऱ्या ६४५ तर १९३७ वाहनांवर जप्तीची कारवाई केली होती. त्याचप्रमाणे आता विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर सुरवातीला दंडात्मक नंतर वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पालिका व पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत. जे व्यवसाय सुरू ठेवण्याला परवानगी आहे तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते की नाही याकडेही पोलिसांचे लक्ष असणार आहे. ज्या व्यावसायिकाकडून निर्देशांचा भंग केला जाईल त्यांचे व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. पोलिस दलातील ज्येष्ठ पोलिसांना शक्‍यतो ठाण्याची ड्यूटी देण्यावर भर देण्यात आला आहे. आंतरजिल्हा वाहतुकीला निर्बंध घातलेले नाहीत.

नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाव्यतिरिक्त विनाकारण घराबाहेर पडू नये. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जातील.

- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com