Kolhapur News : दिव्यांगांच्या कुबड्या पुरात बुडणार?; करवीर तालुक्यातील चित्र, पंचायत समितीमध्ये ५२९ साहित्य वाटपाविना
specialyabled persons equipment : साहित्य वाटपासाठी संबंधित खात्याला मुहूर्त मिळेना असे चित्र आहे. पंचायत समितीमध्ये जागा अपुरी आहे. ते सभागृह, कृषी व समाज कल्याण विभागात रचून ठेवले आहे. यामुळे याच हॉलमध्ये दाटीवाटीने बसून कर्मचाऱ्यांची कामे सुरू असतात. एखादे साहित्य वरून पडण्याची व अपघात होण्याची शक्यता आहे.
Divyangs await support as 529 aids lie unused in Karvir Panchayat officeSakal
कुंडलिक पाटील कुडित्रे : दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुबड्या पुरात बुडण्याची वाट पाहिली जात आहे का? असा प्रश्न लाभार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. करवीर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना सायकल, कुबड्या असे विविध ५२९ साहित्य आले आहे.