‘भूमापन’चे काम आणि महिनाभर थांब; ‘हिब्बानामा’साठी मुस्लिम बांधवांचे कार्यालयात हेलपाटे | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

‘भूमापन’चे काम आणि महिनाभर थांब; ‘हिब्बानामा’साठी मुस्लिम बांधवांचे कार्यालयात हेलपाटे

कोल्हापूर : मुस्लिम बांधवांना आपल्या मिळकतीला नावे लावायची असतील किंवा ती वारशांना द्यायची असेल, तर हिब्बानामा करावा लागतो. यासाठी त्यांना भूमापन कार्यालयाकडून तारीख दिली जाते; पण त्या तारखेला वारशांचे नाव लावण्याचे काम होईलच असे नाही. त्या व्यक्तीला हेलपाटे मारावे लागतात. एका दिवसात होणाऱ्या कामासाठी काही महिने थांबावे लागते. त्यामुळे ‘भूमापनचे काम आणि एक महिना थांब’ अशीच अवस्था नागरिकांची होते.

हेही वाचा: संभाजीराजे संतापले: रायगडावर ‘मदार मोर्चा’ वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न

हिब्बानामासाठी अर्ज केल्यानंतर भूमापन कार्यालयाने संबंधित अर्जदाराला तारखेची नोटीस देणे बंधनकारक आहे. त्या तारखेला ती व्यक्ती वारसांना घेऊन कार्यालयात येते. तेथे अधिकाऱ्यांसमोर वारसांची हरकत, ना हरकत बघून मिळकतीला नावे लावली जातात; पण सध्या यातील कोणतीच प्रक्रिया होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अर्ज केल्यानंतर वारंवार जाऊन चौकशी केल्यानंतर तोंडी तारीख सांगितली जाते. त्या तारखेला वारसांना घेऊन गेले, तर त्या दिवशी संबंधित अधिकारी जागेवर नसतात. त्यानंतर अधिकारी आल्यावर कळवले जाते. त्यावेळी वारस त्यांच्या कामात असतात. एका दिवसाच्या कामासाठी महिने लागतात. बहुतांशी वेळा वारस परगावला असतात. त्यांना सुटी घेऊनच यावे लागते. अशावेळी जर काम झाले नाही, तर तो दिवस वाया जातोच. त्याशिवाय पुन्हा सुटी घेऊन यावे लागते. मिळकतीला आपल्याच वारसाचे नाव लावणे किंवा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हिब्बानामासाठी स्वतंत्र दिवस निश्चित केला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. (समाप्त)

हेही वाचा: मदारी मोर्चाचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडला,

हे होणे आवश्यक

  1. हिब्बानामासाठी अर्ज देताच तारखेची नोटीस द्यावी

  2. महिन्यातील ठरावीक दिवस कामासाठी राखीव असावेत

  3. भूमापन कार्यालयात हिब्बानामासाठी स्वतंत्र विभाग असावा

  4. ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी

हिब्बानामा हा मुस्लिम धर्मीयांसाठी आवश्यक आहे. सध्या त्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. भूमापन कार्यालयाने जर प्रक्रियेची योग्य अंमलबजावणी केली, तर कमी कालावधीत हिब्बानामाचे काम पूर्ण होईल. नागरिकांनाही महिनाभर ताटकळत थांबावे लागणार नाही.

- तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
loading image
go to top