सूर्यकांत मांडरे यांच्या पत्नी सुशीला मांडरे यांचे निधन | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushila mandre

सूर्यकांत मांडरे यांच्या पत्नी सुशीला मांडरे यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते (कै) सूर्यकांत मांडरे यांच्या पत्नी श्रीमती सुशीला सूर्यकांत मांडरे (वय ९५) यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सूर्यकांत मांडरे यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर दोन ते तीन चित्रपटानंतर २६ डिसेंबर १९४७ रोजी त्यांचा विवाह सुशीला यांच्या बरोबर झाला. त्यांचे मुळ नाव सुशीला पिसे. सिनेक्षेत्रातील कलाकाराला अनेक चढउतार पाहावे लागतात. या सगळ्या प्रवासात सुशीला यांनी त्यांना अतिशय खंबीरपणे साथ दिली.

हेही वाचा: ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन

आदर्श पत्नी, सून, आई, आजी, बहिण अशा सर्वच भूमिका त्यांनी कर्तव्यनिष्ठेने पार पाडल्या. फावल्या वेळेत त्यांनी वाचनाबरोबरच अनेक भरतकाम कलाकृती साकारल्या. तीनच वर्षापूर्वी त्यांनी सूर्यकांत मांडरे यांनी साकारलेली चित्रे, शिल्प, भूमिका असलेली छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके आदी अनमोल ठेवा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. सुरवातीला पुणे महापालिकेच्या अखत्यारितीतील आबा बाबुल उद्यानातील पंडित भीमसेन जोशी संग्रहालयात हा ठेवा होत्या. पण, पुणे महापालिकेने तो काढून अन्यत्र ठेवल्याने सुशीला यांच्यासह नात स्वरूपा पोरे यांनी हा ठेवा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या संग्रहालयात हा अनमोल ठेवा ठेवण्याविषयी संमती दिली आणि पुणे महापालिकेकडून हा ठेवा शिवाजी विद्यापीठाकडे आला.

Web Title: Suryakant Mandres Wife Sushila Mandre Passed Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top